Ad will apear here
Next
स्वर प्रभाकर
गोवा ही कलेची भूमी आहे. या गोयंच्या मातीतून अनेक कलाकार घडले आहे. परिपूर्ण मैफलीचा आनंद त्यांच्या गाण्यातून मिळतो. कोणतेही सत्र असले, तरी मैफल रंगविण्यात त्यांची हातोटी आहे, अशी गुणवैशिष्ट्ये सांगत मंगला खाडिलकर यांनी पं. प्रभाकर कारेकर यांचा सुरेल जीवनप्रवास ‘स्वर प्रभाकर’मधून कथन केला आहे.

उत्तर गोव्यातील जुवे हे कारेकरबुवांचे जन्मगाव. पुढे वडिलांनी मडगावला स्थलांतर केल्यानंतर बुवा व त्यांचे भाऊ शाळेत जाऊ लागले. तेथील न्यू इरा हायस्कूलमध्ये त्यांना शिक्षणाबरोबर कलागुणांमध्ये गती मिळाली. उत्तम फुटबॉलपटू ते गायक हा प्रवास तेथूनच सुरू झाला. अनोळख्या मुंबईत आल्यानंतर पं. सुरेश हळदणकर यांचे शिष्यत्त्व पत्करले. त्यांच्याकडे १२ वर्षे गायनाचे धडे गिरवल्यानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिक्षण घेतले. त्यांच्याबरोबर दौरे केले. पु. ल. देशपांडे यांचा सहवास मिळाला. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचे आशीर्वाद व राजाश्रय मिळाला. सवाई गंधर्व महोत्सव, पं. कारेकर यांचे स्नेही या आठवणींसह त्यांचा गानप्रवास येथे वाचायला मिळतो.

पुस्तक : स्वर प्रभाकर
लेखक : मंगला खाडिलकर
प्रकाशक : कौशिक प्रकाशन 
पाने : १७६
किंमत : २७० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZZHCK
Similar Posts
सिनेमाचे दिवस चित्रपटांचे आकर्षण नाही असा माणूस सापडणे मुश्कील; मात्र तो कसा बनतो, त्यासाठी किती लोकांचे कष्ट व प्रतिभा पणाला लागते, त्यात कशा व किती अडचणी येतात, एवढे होऊन सुद्धा तो लागल्यावर त्याचे आणि पर्यायाने निर्मात्याचे भवितव्य कसे अधांतरी असते, हे आपल्याला माहित नसते. करसल्लागार अरुण गोडबोले यांनी चाळीसाव्या वर्षी निर्माता बनून या क्षेत्रात उडी घेतली
वृद्धत्व आनंदी कसे करावे एके काळी साठी पूर्ण करणाऱ्या माणसाचे कौतुक होत असे; पण आता माणसे सहजपणे ८० वर्षांपर्यंत जगतात; मात्र या काळात त्यांना आर्थिक, घरगुती, आरोग्य, वाहन चालविणे अशा अनेक बाबतीत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यातून मार्ग काढत आनंदाने कसे जगावे, त्यासाठी काय पथ्ये व कुपथ्ये आहेत, याचे अनुभवावर आधारित मार्गदर्शन
सिनेमाचे दिवस स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपट निर्मात्याच्या, अरुण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी, प्रेमासाठी, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे
सिनेमाचे दिवस स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झालेल्या आणि सिनेमा, नाटक वर्ज्य असलेल्या घरात जन्मलेला, वाढलेला मुलगा मोठा झाल्यावर चित्रपट निर्माता म्हणून लौकिक प्राप्त करतो, तेही वयाच्या चाळीशीनंतर. या चित्रपटनिर्मात्याच्या, अरूण गोडबोले यांच्या धाडसाची ही कहाणी आहे. कशासाठी?प्रेमासाठी?, नशीबवान, बंडलबाज यांसारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language